स्वर्गीय निवडणुका

Started by सतीश भूमकर, December 27, 2013, 01:03:09 AM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

[ फक्त विनोदी - कुणाच्याही धार्मिक किंवा राजकीय भावना दुखावण्याचा हेतू नाही फक्त विनोदी आणि थोडस काल्पनिक ]

'स्वर्गावर सत्ता कुणाची...?' या काश्मिरसमान प्रश्नावर पारंपरिक पद्धतीने युद्ध न करता सार्वत्रिक निवडणुका घेऊन बहुमत मिळणाऱ्या पक्षास स्वर्गाची सत्ता मिळेल, असा प्रस्ताव 'देव-दानव मिलाप' समितीचे अध्यक्ष नारदमुनी यांनी मांडला. हा प्रस्ताव देवपक्ष व दानवपक्षालाही आवडला व निवडणुका जाहीर होऊन स्व.नि.आ मार्फत म्हणजेच स्वर्गीय निवडणूक आयोगा मार्फत आचारसहिंता लागू करण्यात आली. यामध्ये निवडणूक काळात कुणीही देव-दानव आपल्या शक्तींचा वापर करणार नाहीत असे ठरवण्यात आले. या निवडणुकांमध्ये महिलांना हि सहभाग घेता यावा म्हणून 'कैलास पर्वत' व शेजारील प्रदेश महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आला. यामुळे भगवान शंकराने आपल्या विभागातून पार्वती देवीला उभा करण्याची जोरदार तयारी सुरु केली, तर पार्वतीदेवीस टक्कर देण्यासाठी 'दानवपक्षश्रेष्टी' रावणाने आपली पत्नी 'मंदोदरी' ची उमेदवारी जाहीर केली.आणि इंद्राने आपल्या वार्डातील अपक्ष उमेदवार रंभा ईला पुरस्कृत म्हणून घोषित केले.त्याचप्रमाणे आपल्या पृथ्वीवरून गेलेल्या पूर्वजांनी तिकडे 'आप' पार्टीची शाखा उघडून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि देव-दानवांची संयुक्त मिटिंग ब्रम्हदेवाच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली. या बैठकीत नारदमुनीने पृथ्वीवर 'आप' ने म्हनजेच आम आदमीने दिग्गजांचे उडवलेले धिंडवडे आपल्या नवीन घेतलेल्या संगणकावर यु-ट्यूब मार्फत ऑनलाईन दाखवले त्यामुळे सभेत एकच शांतता पसरली. शेवटी सर्व संमतीने निवडणुका रद्द होऊन स्वर्ग देवांकडे व नर्क दानवांकडे ठेवण्यात आला.

Don't Underestimate The Power Of Common Man....

@सतीश भूमकर...

arth

 :'( :'( :( :-[:'(great faltu bakwas nonsence takla hagra  joke

mahendra chaudhari

चांगला वाटला. पण वस्तूस्थिती नाही.