मी तुला अन तू मला

Started by केदार मेहेंदळे, December 27, 2013, 05:31:05 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

भांडलो दोघे जरी डोळ्यात झरे शेवटी
मी तुला अन तू मला इतकेच खरे शेवटी

फाटका संसार माझा सावरला तू जरी
हाय पडले गं किती हातास चरे शेवटी
 
संकटे आली किती विश्वास तरी अंतरी
पाठराखा देव आहे तोच तरे शेवटी
 
पाहुनी माड्या हवेल्या आज परतलो घरी 
वाटले जीवास या घरकूल बरे शेवटी

वेचले आयुष्य सारे देश रक्षण्या जरी
पांढरा हत्ती तरी वीक्रांत ठरे शेवटी

संपले कर्तव्य सारे भार भुईला नको
गाठले ऐंशी...निघूया... हेच बरे शेवटी


केदार...

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]