बालपण

Started by शिवाजी सांगळे, December 29, 2013, 09:08:38 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बालपण

बनवून होडी कागदाची
पाण्यात हात ओलावित होतो,
सावरीत ओजळीत कवडसे
बालपण पुन्हा शोधीत होतो !

गुंडाळून हाताला दोरी
भोवऱ्यासम गोल फिरत होतो,
तुटक्या भिंगरी टोकाला
धरून पुन्हा फिरवीत होतो !

सांधून कोन कागदांचे
पतंग पुन्हा उडवीत होतो,
निसटल्या नात्यांची वाळू
रचून किल्ला पहात होतो !



©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९