क्रमशः भाग ३...

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 31, 2013, 06:11:39 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

खुप विचार करत होतो
काय करावे सुचत नव्हते
तिला सांगावे तर कसे
काही केल्या उमगत नव्हते

रोजच आम्ही भेटत होतो
बोलणे काही होत नव्हते
hi hello सोडले तर
विषय पुढे सरकत नव्हते

रोज रोज ठरवत होतो
नवीन कल्पना लढवत होतो
येणारा प्रत्येक दिवस
आजचा उद्यावर ढकलत होतो

अशीच वेळ जात होती
Tension हि वाढत होते
असे वाटत होते हातून
सारे काही निसटत होते

अचानक सर्व बदलले
माझे नशिबच चमकले
न राहाउन सरतेशेवटी
तिनेच मला विचारले

कोड्यात म्हणाली एक दिवस
अजून किती फिरायचे
जीवनभरासाठी की
फक्त मित्रच बनून जगायचे

आज वेळ आहे हाती
काहीतरी करायची
आता नाही केले तर
वेळ येईल रडायची

मुलगी असून तिने केले
मला हे खुप feel झाले
चेहरा तिचा ओंजळीत भरून
लग्न करशील का विचारले

तिने मान डोलावली
गालातल्या गालात गोड हसली
खांद्यावर डोके ठेऊन
क्षणभर शांत विसावली

आता लग्न जमलेय
सारे मनासारखे झालेय
प्रेमाच्या त्या बीजाचे
सुंदर रोप बनलेय

सांगणे आहे मित्रांनो
तुम्हीच पुढे चला
असेल खरे प्रेम तर
न घाबरता बोला

संधी फक्त एकदाच येते
पुनः पुनः येत नाही
खरे प्रेम गेले की
जीवनभर मिळत नाही

आता इथेच थांबतो
लग्नाच्या तयारीला लागतो
पुढे काय झाले ते
पुढच्या कवितेत सांगतो...
पुढच्या कवितेत सांगतो...

क्रमशः...

... अंकुश नवघरे.
... Ankush Navghare.

क्रमश भाग १-Link-http://marathikavita.co.in/index.php/topic,10607.msg35481.html#msg35481
क्रमश भाग २-Link-http://marathikavita.co.in/index.php/topic,10685.msg35793.html#msg35793