संसाराची ऎशी तॆशी

Started by aap, January 02, 2014, 03:21:30 PM

Previous topic - Next topic

aap


संसाराची ऎशी  तॆशी

प्रियतमा ती माझी भाळलो तिजवरी
सुंदर ती सुमुखी

     लग्नानंतर नवी नवती
     भासे मज ती चंद्रमुखी

रुळता रुळता रुळे संसारी
भांडयाला लागे भांडे वाटे ती सुर्यमुखी

      तू तू मी मी करिता ठेच पोहचे अंतरात्मी
      उठे ठिणगी संसारी वाटे ती ज्वालामुखी

संसाराची ऎशी तॆशी
पडलो मी तोंडघशी
सुखद चूक विवाहाची

सौ अनिता फणसळकर         

अमित

सुमुखी, चंद्रमुखी, सूर्यमुखी, ज्वालामुखी
झाली आहेस एव्हाना तू शाश्वतची डोकेदुखी
.
.
केले लग्न मी तुझ्याशी, आणि पडलो तोंडघशी
म्हणच आहे - अग म्हशी, मला तू कुठे नेशी?