पहिल्‍या क्षणाची भेट

Started by Lyrics Swapnil Chatge, January 03, 2014, 08:02:26 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

आपल्‍या त्‍या पहिल्‍या,

क्षणाच्‍या भेटीत,

आपल्‍या जीवनाला वेगळीच

वळण आणून दिली....

आपण दोघेही एकमेकांना,

ओळखत नसताना...

आपल्‍या जीवनाला वेगळीच,

भावना निर्माण करुन दिली...

असं का तुझ्या त्‍या नजरेत,

नजर निभावत गेली...

तु माझ्यात आणि मी तुझ्यात,

कळत नकळत हरवत गेलो...

तुझे ते निरागस डोळे का,

माझ्या डोळ्याशी निभावत गेले

की पाहुनी तुला बनवल आहे,

फक्‍त माझ्यासाठी

असं वाटतं गेलं....

- स्‍वप्‍नील चटगे

[/size]