मी हिजडा का झालो ?

Started by शिवाजी सांगळे, January 05, 2014, 08:00:38 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दोन दिवसापूर्वी आकांक्षा थियेटर, पुणे प्रस्तुत, सागर लोधी लिखित व दिग्दर्शित नाटक "हिजडा" पहिले, विषय रोजचाच, पण अंतर्मुख करणारा, त्यातील जाणवलेल्या आशयाच्या वेदनांची कविता.

मी हिजडा का झालो ?

मी तसा का नाही झालो?
मी असा कसा झालो ?
दैवाला माझ्या सवाल माझा
मी हिजडा का झालो ?

गुरफटलो भावनांच्या गुंत्यात
जगायचे केवळ जगत आलो,
नाकारून दुनियेने साऱ्या
मी हिजडा का झालो ?

दोष कुणाचा? कसा? कधी ?
विचारीत मनाला प्रश्न आलो,
पचवीत हेटाळणी समाजाची...
मी हिजडा का झालो ?

हवे जगणे सामान्य मला
मलाच मी मनवित आलो,
अस्तित्व आमुचे करा मान्य
विनंती तुम्हा करण्या आलो !

उरतो पुन्हा एक प्रश्न...
मी हिजडा का झालो ?
मी हिजडा का झालो ?


© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com
9422779941 / 9545976589
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९