सांगू कुणा कशी मी

Started by Sadhanaa, January 09, 2014, 10:04:05 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

सांगू कुणा कशी मी

  मनोव्यथा मनाची

दुखाःत पोळलेल्या अन

  करपलेल्या जीवाची ।

नाहीं मनांत आले कधी

  राहीन एकली मी

जीवनांतील सुखाला

  होईन पारखी  मी ।

मनी दैव सहज हसले

  पाहुनि दुर्दम्य आशा

क्षणांत एका तयाने

   केली परि निराशा ।

प्रीतित मम सखाच्या

  मोदात दंग होते

सहवासात त्याच्या अन

  जग विसरून जात होते ।

वाटला हेवा तयाला

  म्हणून का तयास नेले

जीवाचे  वैराण-वाळवंट केले । ।

                           रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ... Please click on this
http://www.kaviravi.com/2013/07/love-poem_11.html

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९