निरोप……

Started by टिंग्याची आई..., January 09, 2014, 04:23:06 PM

Previous topic - Next topic

टिंग्याची आई...

काही दिवसापूर्वी एक कविता लिहिली... "तो Onsite ला निघालाय (http://tingyaachiaai.blogspot.com/2013/12/onsite.html)... त्यात एक कडवं होतं ज्यात तो तिला निरोप द्यायला जातो... तिला एकदाचं डोळे भरून पाहायला.... त्यावरूनच सुचलेली हि कविता... त्यांच्या निरोपाचा प्रसंग... विस्तारित वृत्त.... ;-)

निरोप......
आजही आठवते ती संध्याकाळ.... निरोपाची होती...
निघण्यापूर्वी एकमेकांना डोळेभरून पहायची... शेवटची संधी होती...
आठ दिवसापूर्वीच त्याची... निघायची तारीख कळली...
शॉपिंग आणि Packing.... सगळी तयारीही तिनेच होती केली...
Excitement वगैरे सगळं ठीक... पण आज जीवावर आलं होतं...
एकमेकांना सोडून जाणं... दोघांनाही अवघड झालं होतं...
सगळी तयारी झाली... निघायचा दिवस उद्यावर येउन ठेपला...
आज सारी काम बाजूला सारून... तो तिला येऊन भेटला...

न बोलावता तीही आज... त्यांच्या फेवरेट जागेवर हजर होती...
नेहमीसारखीच निशिगंधेची फुलं घेऊन... त्याची वाट पाहत उभी होती...
दरवेळी हमखास विसरणारा गुलाब... तो आज आठवणीने घेऊन गेला...
हळुवार तिच्या हातात देताना... नेमका त्याचा काटाच तिला बोचला...
काटा तिला लागला... पण कळ त्याला आली...
पापण्यामधलं पाणी अडवत... ती फक्त शांत हसली...
माझ्याविना हि कशी राहील...? याचा विचार तो करत होता...
अन त्याला न पाहता दिवस कसा सरणार...? हा प्रश्न तिला पडला होता...
कोणीच काही बोलेना... दोघेही तासभर नुसतेच बसून होते...
हातात गुंतलेले हातच... दोघांचं मुक्याने सांत्वन करत होते...

पाण्याने टच्च भरलेले तिचे डोळे... अस्पष्ट दिसणारी जमीन न्याहाळत होते...
अन त्याचे दोन्ही डोळे... तिला जमेल तितकं डोळ्यांत साठवत होते...
"नको ना रे जाऊ..." तिने एकदातरी म्हणावस त्याला वाटत होतं...
"मला नाही जायचं तुला सोडून..." हे तिला त्याच्या तोंडून ऐकायचं होतं...
एवढी इच्छा असूनही... कोणीच काही म्हटलं नाही...
आतल्याआत घुसमटणार मन... आज पहिल्यांदाच बोललं नाही...
न राहवून हळूच तिने... त्याच्या खांद्यावर डोकं टेकलं...
तिला घट्ट मिठीत घ्यावं... त्यालाही अगदी त्याच क्षणी वाटलं...

अजून थोडासा वेळ... तसाच शांतपणे निघून गेला...
एकमेकांसोबतचं त्याचं एकटेपण... आज चंद्र लांबूनच बघून गेला...
हातातला हात सोडवत... शेवटी एकदाचा तो जायला उठला...
इतका वेळ अडवून ठेवलं... पण आता मात्र तिचा बंध फुटला...
दोन्ही टपोऱ्या डोळ्यातून... घळ घळ पाणी वाहू लागलं...
केवीलवाण त्याचं प्रतिबिंब... त्या अश्रुंसोबत वाहू लागलं...
मन घट्ट करून... त्याने तिला मिठीत घेतलं...
त्याचंही मन चिंब भिजेपर्यंत... तिने मनमोकळ रडून घेतलं...

अश्रूंना बांध घालत... शेवटी दोघांनी एकमेकांना सावरलं...
हसत हसत निरोप घ्यायचा... मनाशी पक्क ठरवलं...
नको इतक्या जड अंतकरणाने... तिने त्याचा निरोप घेतला...
लवकरच परत यायला... तो तिचा निरोप घेऊन निघाला...
तो अंधारात दिसेनासा होईपर्यंत... ती तिथेच उभी राहिली...
निरोपाची हि संध्याकाळ दोघांसाठीही... पुन्हा भेटेपर्यंत जणू तिथेच होती थांबली...

- टिंग्याची आई :)

http://tingyaachiaai.blogspot.com