रेषा

Started by Mangesh Kocharekar, January 12, 2014, 01:38:27 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


पुसता आली जर तुमच्या माझ्यातली रेषा
मिटवता आल जर वाढत्या वयातल अंतर
मित्र हो खरच  काय मजा आला असता !
लुटला असता पुन्हा नवा  जीवनाचा बहर
     बसलो असतो तुमच्या थव्यात मैत्रिणी सोबत गप्पा मारत
     अन मग मात्र आली असती जीवनाला वेगळी रंगत
      तिच्या निळ्या डोळ्याच्या डोहात गेलो असतो झिरपत
     तिनेच घेतली असती माझ्या चोरट्या  नजरेची हरकत
गेलो असतो मोहरून तिच्या हळव्या स्पर्शात   
अनुभवली असती पुन्हा प्रेमाची अपूर्ण कहाणी
कोंडून घेतलं असत तिच्या केसांच्या बटांनी
अन जागवली असती तिच्या श्वासात जवानी
       खाल्ली असती भेळ ऐकमेकांच्या मुखी भरवत
      दाखवली असती अशाच तरुण मित्रांची गंमत
       धावलो असतो फेसाळणा-या समुद्राच्या लाटांत   
       प्रेमाच्या गप्पा रंगल्या असत्या गुंतल्या हातात
फिरलो असतो मरीनचा किनारा सोबतीला ती अंन भन्नाट वारा   
आमच्या वरती कोणी दिला नसता उगीचच पहारा
तिच्या कानात   गुणगुणला असता गार समुद्र वारा
म्हणाला असता तिला पहा तुझ्या या तरुण मित्राचा नखरा
       वाटला असता मग तिला तिचाच हेवा
       चिमटा घेत म्हणाली असती जर दूर जावा
                        मंगेश कोचरेकर