सई चालेल का तुला......

Started by कवि - विजय सुर्यवंशी., January 13, 2014, 06:58:52 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

''एके दिवशी या वेडाबाईचा फोन आला आणी ती म्हणाली बाहेर बघ किती छान पाऊस पडतोय एखादी छानशी कविता कर ना. तिच्या या वेड्या हट्टसाठी सुचलेल्या या काही ओळी..."
.
सई चालेल का तुला....??
.
सोबतीला जर तु असतीस माझ्या,
कविता ही मग मी केली असती...
शब्दांच्या त्या ओढीने मग,
सर पावसाची धावुनी आली असती...
अनं सोबत माझी जिंकण्या तिने,
तुझ्याशीच स्पर्धा केली असती....!!!!
सई चालेल का तुला...??
.
तुझ्या बटांशी चाळा करणार,
तो खट्याळ वारा...
सोबतीला आपल्या मग,
मेघाच्या त्या शुभ्र धारा...
थेंब मोतीयांचे तनुवरी,
अनं माणकापरी गारांचा पसारा...
काया मग तुझीही भिजुन गेली असती...!!!!
सई चालेल का तुला...??
.
शुभ्र धारांच्या त्या वर्षावात,
मी ही दंगुन गेलो असतो...
भिजुनी लहान झालेलं तुला पाहता,
मंत्रमुग्ध मी झालो असतो...
काया तुझी लाजेनं चुर-चुर झाली असती...!!!!
सई चालेल का तुला...??
.
निरव ती शांतता,
अनं प्रेमळ तो एकांत...
ओथंबलेल्या त्या प्रेमाचा,
वाटे नच व्हावा कधिही अंत...

ओझरत्या त्या अंतरामध्ये,
स्पर्शाची खंत उरली नसती...!!!!
सई चालेल का तुला...??
.
धुंद वेळीचे भास,
अनं थेंबाथेंबांची आरास...
कुंद त्या गारव्यामध्ये,
गंधाळलेला तो श्वास...
तुझ्या वेणीतल्या मोगय्राने,

मग शुध्द माझी हरपली असती...!!!!
सई चालेल का तुला...??
.
उबदार त्या मिठीमध्ये,
भान अंतराचे उरले नसते...
निरागस त्या डोळ्यांमध्ये,
आसवांनी प्रेम भरले असते...
मिलनाच्या ऐश्या घडीला,
कसलीच चाहुल उरली नसती...!!!!
सई चालेल का तुला...??
.
कवि – विजय सुर्यवंशी.
    (यांत्रिकी अभियंता)

मिलिंद कुंभारे

उबदार त्या मिठीमध्ये,
भान अंतराचे उरले नसते...
निरगस त्या डोळ्यांमध्ये,
आसवांनी प्रेम भरले असते...
मिलनाच्या ऐश्या घडीला,
कसलीच चाहुल उरली नसती...

nice one..... :)

कवि - विजय सुर्यवंशी.


उबदार त्या मिठीमध्ये,
भान अंतराचे उरले नसते...
निरगस त्या डोळ्यांमध्ये,
आसवांनी प्रेम भरले असते...
मिलनाच्या ऐश्या घडीला,
कसलीच चाहुल उरली नसती...

nice one..... :)
.
.
.
आभारी आहे मिलिंद...........

sweetsunita66

छान  शृंगारिक कविता !!

कवि - विजय सुर्यवंशी.