माझे प्रेम खोटेच ठरले...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., January 15, 2014, 02:17:00 PM

Previous topic - Next topic
तु सोडून गेल्यापासून,
मला दुःखाने असे काही घेरले.....

आले भयानक विरहाचे क्षण,
माझे ग्रह तारेच फिरले.....

विसरलो मी हसणे आता,
सुखाचे दिवस रडण्यातच सरले.....

पाठीवरती हात ठेवूनी,
थांब म्हणाया कोणी ना उरले.....

जिवापाड प्रेम करुन देखील,
शेवटी माझे प्रेम खोटेच ठरले.....

माझे प्रेम खोटेच ठरले...!!
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक १५-०१-२०१४...
दुपारी १२,५२...
© सुरेश सोनावणे.....