आई

Started by aap, January 16, 2014, 02:47:57 PM

Previous topic - Next topic

aap

आई

नीज न येई गीत म्हणावे
अथवा झोके देत बसावे
कोण करी हे जीवे भावे
ती माझी आई

रडवे माझे वदन बघुनी
भूक लागली हे जाणुनी
कोण उगी करी मज पाजुनी
ती माझी आई

हसता  मजकडे पाहुनी हसते
मुके मटामट किती तरी घेते
परी अंतरीची तृप्त न होते
ती माझी आई

स्मरता ऋण  ममतेचे आई
तव उपकारा सीमा नाही
कॆसा होऊ मी उतराई
गे माझे आई
unknown
संग्रहित सौ . अनिता फणसळकर   

sweetsunita66