कोणाच्या हसण्यात धुंद होऊन जावं....

Started by suchitra shedge, January 18, 2014, 02:34:02 PM

Previous topic - Next topic

suchitra shedge

कोणाच्या हसण्यात धुंद होऊन जावं....
कोणाच दुख मिळाल तर उधार घ्यावं...
कोणाच्या प्रेमात अखंड बुडून जावं....
खरतर जीवन हे असच जगावं.....

मानलं आपला खिसा रिकामा आहे...
पण आपण मनाने परिपूर्ण आहोत...
संपेन जे प्रेमासाठी हे जीवन...
जळेल जे बहरण्यासाठी हे जीवन...
कोणाला असो वा नसो कदर....
आपण फक्त प्रेमात वाहवत जाव....
खरतर जीवन हे असच जगावं.....

नात मनाचं मनाशी विश्वासाचं...
जिवंत आहे नाव आपल्यामुळेच प्रेमाचं....
कि मरून पण कोणाच्या नेहमी आठवणीत राहावं...
कोणाच्या आसवांमध्ये हसत राहावं...
नेहमी फुलांनी पण कळ्यांना म्हणावं ...
खरतर जीवन हे असच जगावं....

- Suचित्रा Sheडगे—
:) ;) :) ;)

Çhèx Thakare



sanju pashte



snehal akare.

DOLYANI BAGHEL TULA,
TR MANANI SPARSH KAREL,
TUZYA SUKH DUKHAT HATH MI TUZA DHAREL,
SUKHAT TUZYA SOBAT PREMANE RAHIL,
TR DUKHAT TUZYA HATAT MAZA SATH RAHIL,
JIVAN SANGINI BANEL ME TUZI,
KADHI TUZA VISHVAS TODNAR NHI,
TUZYA SHIVAY MAZYA JIVNACHA EK SHANHI PURN HONAR NHI.