|| तुझा तो मोरपिस ... ||

Started by Çhèx Thakare, January 23, 2014, 08:58:28 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

||  तुझा तो मोरपिस ...  ||
.
.
तुझा तो मोरपिस
मी
अजूनही जपून ठेवलाय
तुझ्या प्रेमा पोटी
ईतरांपासून
मी नेहमीच लपून ठेवलाय
.
तुझा
मोरपिसातला सुगंध
मी
नेहमीच ग हुंगतो
मनात प्रेमाचे तुषारे ऊडवून
मनात
नेहमीच माझ्या पांगतो
.
तुझी वही सुद्धा अठवते
त्यातली तुझी सही सुद्धा अठवते
तु सुद्धा खुप अठवते
लाजून बोललेल तुझ "नही" सुद्धा अठवते
.
तु दिलेला मोरपिस
मी कधी कधी गालावरून माझ्या
फिरवतो
कधी कपाळावर ठेऊन
तुझा कृष्ण बणून
बंद रूम मधेच मिरवतो
.
खुप गुदगुल्या होतात ग
पापण्यांना
मोरपिस जेव्हा टेकतो
त्या रंगात तुझे
प्रतिबिंब दाखवून
तुला एकट्यातच
जेव्हा भेटतो
.
वारयाने जेव्हा
तुझा मोरपिस
अलगद ऊडून जातो
तुझ्या मागे धावण्याचा
मला तो
भास घडवून जातो
.
तरीही मी त्याला पकडतो
मनाशी जपतो
ईतरां पासून लपवतो
वहीमधे सजवतो
तु दिलेला मोरपिस ..
तुझ्या प्रेमाचा तो मोरपिस ..
.
.
©  चेतन ठाकरे