मैत्रीचा मृत्यू

Started by विक्रांत, January 26, 2014, 07:18:28 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

धार धार शस्त्राने
फांदी तुटावी तसे
मित्र तुटतात क्षणात 
एकाच घावात
पैशाच्या आसक्तीने
स्त्रीच्या स्वमित्वाने
कामाच्या वाटणीने
घडतात वाग्युद्ध
शब्दाने शब्द वाढत जातो
अन डिवचलेला अहंकार
सहज विसरुन जातो
त्यागाचे  प्रेमाचे
हास्याचे  सुखाचे
अन सहवासाचे
विलक्षण क्षण ..
साऱ्या स्मृती कालच्या
जळून जातात क्रोधाच्या जाळात
मैत्रीच्या भूमीत रुजलेले वैर
फारच संहारक असते
कारण मैत्रीचा मृत्यू
हा कदाचित
आपला स्वत:चाच मृत्यू असतो
त्यामुळे
ते प्रेम जेव्हा मरते
तेव्हा सारी जमीन
नापीक झालेली असते

विक्रांत प्रभाकर