फसवणूक

Started by केदार मेहेंदळे, January 28, 2014, 11:38:10 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 वृत्त : आनंदकंद
लगावली : गागा लगाल गागा/ गागा लगाल गागा

तत्वांस मोल नाही पैशास मान सारे
येथे उगा मिरवती खोटीच शान सारे

गप्पा सुशासनाच्या खोट्याच वल्गना या
सत्तेस बांधलेले यांचे इमान सारे

बोली समानतेची झाडू निशाण यांचे 
विसरून वायदे का बसले गुमान सारे? 

फसणार ना कुणीही टेपांस आज यांच्या 
भाषा प्रचारकीची नुस्ते तुफान सारे

आंदोलनात ज्यांना होती खरी प्रतिष्ठा 
आण्णांस सोडता ते झाले लहान सारे 

सत्तेस मोल नाही ''केदार'' सांग त्यांना
''हातात'' ''आप'' याचे ठेवाच भान सारे

केदार...

कवि । डी.....

खुपच छान. ............ :) :) :)

sweetsunita66


छान केदार !!!


पंजा असो वा  कमल
जुनेच राग सारे
झाडूने होत नाही
जळमट नष्ट सारे
टेबला खालील हातात
जोवर लक्ष्मीचा वास
तोवर स्वप्न लोकी 
सुराज्याचा आभास ...। सुनिता .....