अगदी सहजपणे जवळ आलो होतो

Started by pankajnkadam, January 30, 2014, 10:39:52 AM

Previous topic - Next topic

pankajnkadam

अगदी सहजपणे जवळ आलो होतो,
तितक्याच सहजपणे दुरही झालोच ना.
फक्त तितक्या सहजपणे तुझ्या आठवणींपासून दूर नाही होता येत.

पूर्वी हसायला काहीही कारणं चालायची,
आता कारण असून सुद्धा हसत नाही.
कारण असून रडतही नाही मी आजकाल.

पूर्वी सोबत चालताना वाटेचं भानच नसायचं,
आज एकट्या माझ्याकडे बघताना वाटेला कससच वाटतं.
स्वतःसाठी नव्हे मी तिला वाईट वाटायला नको म्हणून वाट टाळतो.

तू भेटण्या आधी गुलाबाचा गंधच कळला नाही,
तू गेल्यावर सुकलेलं गुलाबही जपून ठेवलंय.
सवय आहे मला,तुझ्या बाबतीतही मी असंच तर केलंय.

हात कधी हातात येतील हे वाटलच नव्हतं,
हातातले हात सुटतील हेही वाटलच नव्हतं.
मला वाटतंय मी जगेन आता फार,पण मला वाटतंय तसं होतंय कुठे.

एकदा तू विसरलेला रुमाल आठवल्यावर आलेलीस घ्यायला,
मी हि तो छान घडी करून जपून ठेवला होता,
आता मला विसरलीयेस, स्वताला तसं जपणं कठीण आहे मला...