तूच कविता आहेस…. तुझ्यावर कविता काय करणार….

Started by prasad gawand, January 31, 2014, 02:11:45 AM

Previous topic - Next topic

prasad gawand

तूच कविता आहेस.... तुझ्यावर कविता काय करणार....

तुला पाहताच कविता सुचते
तुझ्यासाठी कविता काय करणार ...
मी कविता लिहायला घेतली तर
माझे शब्द हि तुझे होवून जाणार ....

मृगजळासमान तू
तुला ह्या एकांताच्या वाळवंटात कसं शोधणार ...
क्षितीजापलिकडचे अस्तित्व तुझे 
ह्या कवितेत कसं मांडणार ....

तुझ्यासाठी पुस्तक लिहलं तरी कमी आहे
मग तुला मोजक्या शब्दात कसं वेचणार ...
तू लेखणीतून उमटलेल्या प्रतीमेसारखी
तुझी प्रतिमा ह्या कवीला कशी उमगणार ....

शिंपल्यातल्या मोत्यासारखी सुंदर तू
तुझी सुंदरता त्या शिंपल्या शिवाय कुणाला कळणार ...
तूच एक सुंदर कविता आहेस
तुझ्यावर कविता काय करणार ....

- प्रसाद गावंड[/size]