अशी ती फुलपाखरु....

Started by Lyrics Swapnil Chatge, January 31, 2014, 12:56:49 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

"फुलपाखरु"
रात्र सरली,पहाट आली
हिरव्या पाणावर,
दवबिदु ही सजली..
कोवळ्या किरणात
ही शोभुन दिसली..
अशी ती कोमल कळी....!!
भरकटली जरा बावरी,
स्वत:ला ना सावरी..
दाखवत मोहचा रंग,
सर्वत्र पळत सुटली...
अशी ती रंग बावरी....!!
भरुनी उरी या,
प्रेमाचा नवा गंध..
वाटते आता मला,
उडावे त्याच्या संग...
अशी ती जरा चावरी...!!
©स्वप्निल चटगे.