रंगलेल्यात रात्रीले...

Started by Sadhanaa, February 01, 2014, 02:28:34 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

रंगलेल्या रात्रीतले मम
स्वप्नं ते विसरून गेले
         प्रिया होती माझी तेव्हां
मन नीरस नाहीं झाले
आज परंतु तिच्या अभावी
सौख्य मना नाहीं शिवले ।
         क्षणो-क्षणी झिजून तिने
मंदिर एक उभे केले
उध्वस्त संसारात माझ्या
धर्मशाळेचे रूप आले ।
         आज परंतु फक्त मागे
मंदिर राहिले दुभंगलेले ।
उध्वस्त तो संसार अन
मंदिर ते दुभंगलेले
         त्यांतच माझ्या जीवनाचे
थडगे आहे बांधलेले ।।



Çhèx Thakare