•|| न कळले मला ||•

Started by Çhèx Thakare, February 02, 2014, 05:23:09 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

•||  न कळले मला  ||•
.
.
शब्द मनातले, मन यौवनातले
क्षण मोहातले, न कळले मला ||1||
.
स्वप्न रातीतले, गोड मनातले
बंधिस्त वनातले,  न कळले मला ||2||
.
नविन भास, कोवळे ते श्वास
नवे आभास, न कळले मला ||3||
.
मन निर्मळ, प्रेमात माझे
क्षणात तिचे,  न कळले मला ||4||
.
असे कसे हे, नविन स्पर्श
रोमहर्श,  न कळले मला ||5||
.
तिचे लाजणे, माझे लाजणे
लपुन बघणे,  न कळले मला ||6||
.
पत्र लिहणे, पत्र वाचणे
शब्द अनूभवणे,  न कळले मला ||7||
.
विचारमग्न, बेभान मन
तळमळते तन,  न कळले मला ||8||
.
गोड राञी, स्वप्न बघणे
सोबत ती असणे,  न कळले मला ||9||
.
प्रेम माझे,  प्रेम तिचे
प्रेम आमचे,  न कळले मला ||10||
.
.
©  चेतन ठाकरे



सतीश भूमकर

पण कविता मात्र कळली बरका आम्हाला....

Çhèx Thakare

हा हा मला पण अत्ताच कळली ..


ना तुला कळले,

ना तिला कळले.....

याच गोष्टीचा विचार करुन,

हे काव्य लिहले.....
:-P  :-P  :-P

©सुरेश सोनावणे.....

Çhèx Thakare

dhanyawad pranav  :) kya bat hai suresh ji bahut khup  ;)  :D