प्रेमकथा

Started by sunitav, February 04, 2014, 04:24:23 PM

Previous topic - Next topic

sunitav

कथा आपल्या दोघांची
तुझ्या माझ्या प्रेमाची

तू माझ्याकडे पहायचास
अन तुझ्या नजरेला मी नजर द्यायची
तू केलेली प्रत्येक कविता
मला माझ्यासाठीच वाटायची

शोना म्हणून लाडाने बोलायचास
तेव्हा हरखून मी जायची
भविष्याची स्वप्न मी तुला घेऊनच पहायची

अचानक मला तू तिच्या सोबत दिसलास
हातात हात घालून होता चाललास

का रे माझा असा विश्वासघात केलास ?

स्वप्नाच्या भीतीने झोप लागत नाही
प्रेमावर तर आता विश्वासच राहिला नाही

एकच सांगण आहे कुणाच्या मनाशी असा खेळू नकोस
दुसरीचा तरी आता विश्वासघात करू नकोस .

सुनिता .