अनोळखी

Started by sunitav, February 05, 2014, 07:41:08 PM

Previous topic - Next topic

sunitav

अनोळखी मी मलाच
कशास पुसू कुणाचे नाव

ज्ञात नाही माझे मलाच
समजून घेऊ का लोकासी उगाच

ओळख माझी मलाच नसे
अनामिक मी माझ्यात वसे

माझे विचार मला न कळती
नाठाळ शब्द मनात वसती

समजून घ्यावे मीच मला
दोष नको उगाच कुणाला

जगणे होईल तेवा सुकर
चिंता होतील सर्वच दूर

सुनिता .