|| कष्ट ... ||

Started by Çhèx Thakare, February 05, 2014, 09:38:58 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

कष्ट ...
.
.
कष्टाशी आमचे,
ते नातेच जुने आहे
जीवनात आमच्या,
सारेच उणे आहे
.
.
पिढ्यान पिढ्या
सोसून ते दुखः
दुखाःचे आमचे,
हे गाणेच जुने आहे
.
.
अंगावरील घाम,
आमच्या कष्टाची खून आहे
पुसट हातावरच्या रेषा,
त्या कष्टाची देण आहे
.
.
तरीही न थकता
आम्ही केलेत नेहमी कष्ट
कारण जीवनाचे आमच्यावर,
खूप मोठेच ऋण आहे
.
.
मिळणाऱ्या फळाची उमेद,
मनात अजून आहे
प्रयत्नात आम्ही कष्ट
अजून जपून आहे
.
.
देवाच्या दारी
नोंद सर्व असून
आमच्याही नोंदीत
प्रगतीचे पान अजून आहे
.
.
© चेतन ठाकरे ..

sweetsunita66


vijaya kelkar


शिवाजी सांगळे

चेतन, छान, पण कष्टाचा खून केलास....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९


Çhèx Thakare

धन्यवाद सुनिताजी,  विजय जी  ,  शिव हा ही  ,  pakya_s85 आपल्या सर्वाचे आभार ..

vijaya kelkar

कृपया नोंद घ्यावी...मी विजया केळकर

Çhèx Thakare

क्षमा असावी मी नाव स्पष्ट पणे पाहीले नव्हते तुमचे,  थोडा घाईत असल्याने नावाची गफलत झाली माझ्या कडून  ..