पहिल प्रेम

Started by RS111, February 05, 2014, 11:11:20 PM

Previous topic - Next topic

RS111

तुला पहिल जेंव्हा पहिल्यांदा ,
जग स्तब्ध झालं सारं .
दिवस होता गर्मीचा ,
तरी केसांत भिनू लागलं वारं  .

तास होता गणिताचा ,
लक्ष होतं फक्त घड्याळाच्या आकड्यावर .
बसून बसून कुठे बसलीस ,
माझ्या  नाही माझ्या शेजारच्या बाकड्यावर .

काय मधुर आहे तुझा आवाज ,
काय सुंदर  आहे तुझे  रूप ,
घरी गेल्यानंतर ,
तुझी आठवण येते खूप .

डोळे भरून पाहतो तुला ,
समोर जेव्हा दिसतेस .
घायाळ होऊन जातो ,
जेव्हा पाहून मला हसतेस .

मैत्री आपली जमली ,
कॉलेज भर  झाले आपले नाव .
अनेकांनी प्रयत्नकेला  तोडायचा ,
पण जमला नाही डाव .

दुखावली  गेलीस  तू ,
कि ठेच  मला बसते ,
तूच म्हणतेस मला ,
कि  छोट्या गोष्टीवर रुसायचे  नसते .

सहवासात तुझ्या ,वेळ कसा गेला
कसे नाही कळत .
उशीर झाला तरी ,
पाय घराकडे नाही घराकडे  नाही वळत .

असा वाटतं  कधी ,
तुला चंद्रावर  मी न्यावं .
चंद्रावर नसतं कुणी ,
म्हणून मिठीत भरून घ्यावं .

स्वप्नातले , अंतःकरणातले ,खरया जीवनातले ,
क्षण  आहेत हे काही .
कधी पडलो तुझ्या प्रेमात ,
मलाच कळले  नाही .

प्रोपोजे  तुला केले ,
तेव्हा  गेलीस तू  पळून .
कळले मला उत्तर ,
जेव्हा हसून पाहिलंस वळून .


                                 -Rohit.S

           
                                             

मिलिंद कुंभारे


vijaya kelkar

   मिलिंद शी सहमत

SANJAY SHINDE

CHAN MAST HI KAVITA  ROHIT , BEST OFF LACK YAR NEW KAVITASATHI

RS111

बसल्या बसल्या कसे शब्द मला सुचले ,
धन्यवाद हो तुमचे ,कि शब्द माझे रुचले .