पतंग

Started by sunitav, February 06, 2014, 10:57:45 AM

Previous topic - Next topic

sunitav

आज पतंगाने कमालच केली
कितीही उड्या मारून उडवलं तरी स्वारी अडूनच बसली
तो उडायालाच तयार नव्हता
त्याला वाऱ्याचा राग आला होता

मला म्हणाला सोडू नकोस अस वाऱ्यावर
घेऊन जाईल मला तो दूर अन नाचवेल त्याच्या तालावर

कधी कधी द्वाडपणा करतो
अन सगळ्यासमोर पदर माझा खेचतो
बोलायला गेल तर दुसऱ्याशी तर खेचून मला नेतो
अन लागल कुणी माझ्या मागे तर कापून त्याला काढतो

मला एकट राहायचा खरच आता कंटाळा आला
वाऱ्याने मला फारच त्रास दिला

जो पर्यंत तो होणार नाही शांत
तो पर्यंत मी उडणार नाही आकाशात

अस बोलून तो नाही उडाला
अन रागाने मी त्याला फाडला

सुनिता .