कविता

Started by sunitav, February 06, 2014, 10:59:11 AM

Previous topic - Next topic

sunitav

स्वयंपाक घरात गेले जेवण बनवायला
अन लागले कि शब्द फेर धरून नाचायला
चपाती लागले लाटायला
तर शब्द लागले बोलायला
अग चिरडू नकोस मला
वापर करून कवितेत
दे लोकांना वाचायला

भेंडी लागले चिरायला तर भेन्डीतल्या बिया लागल्या वळवळायला
म्हणतात कशा मला अग घेऊन चल मला आणि सजव तुझ्या कवितेला
कांद्याची तर तऱ्हाच न्यारी
त्याला रडवायची हौस भारी
माझ्या कवितेत जागा हवी त्याला
लोकांना थोडस भावूक व्हायला

झोपेत पण शब्द लागले काजव्यासारखे चमकायला
उठले ताडकन झोपेतून अन लागले कविता लिहायला
अन घेऊन आले माझी कविता
तुम्हा सर्वांचे मनोरंजन करायला .
सुनिता .

vijaya kelkar

व्वा ____________व्वा
bestऑफ luck स्वयंपाक व कवितेसाठी ~~