अशांत

Started by sunitav, February 06, 2014, 11:01:58 AM

Previous topic - Next topic

sunitav

खूप काही लिहावेसे वाटते ,पण शब्दच सुचत नाहीत
हातात हात घालून फिरावेसे वाटते ,पण पायच पुढे सरकत नाहीत
मनामध्ये प्रेम आहे पण व्यक करता येत नाही .
सगळ काही आलबेल आहे ,पण मनच शांत नाही
विचारच काहूर माजलंय त्याला वाचा फुटतच नाही
आनंद सगळा सावडायचा आहे ,पण दुखः च दूर सारता येत नाही
मन सारख धावत त्याला थांबवताच येत नाही
खूप काही करावस वाटत ,पण कृति घडतच नाही
येणारया म्हातारपणाच ओझं घेऊन तरुणपण जगताच येत नाही
खूप काही सांगायच आहे ,पण ओठी शब्दच येत नाहीत
आयुष्य म्हणजे तगमग,तडफड ह्या शिवाय काहीच नाही .

vijaya kelkar

  छान -----
....शुध्द लेखन तपासावे म्हटल्यास आवश्यक सूचना