तूझ्यासाठी

Started by hareshparab, February 06, 2014, 05:14:20 PM

Previous topic - Next topic

hareshparab

तुला वाटेल ते करावे
तुला आवडेल  तस  वागावे
तु मागशील  ते  तुला  द्याव
तुला पाहून स्वतःला  विसरावे
असाच काहीस  वाटतंय  आज  मला
तूझ्यासाठी 

अश्रुना  तुझ्या  मोती  बनवून  साठवावं
हास्याला  फुल  बनवून
तूझ्या  दुखात  तुला  हसवाव
दुखात  तुझ्या स्वताहाला रमवाव
असाच काहीस  वाटतंय  आज  मला
तूझ्यासाठी 

तू  रुसावस  अंन  मी  त्या  रुसव्याला सोडवावं
तू रागवावास  अंन  मी  तुला  पुन्हा  हसवाव
तूझ्या  बैचेनीत  मी  तुला  मिठीत  घ्याव 
असाच काहीस  वाटतंय  आज  मला
तूझ्यासाठी

तूझ्या  साठी  माझा  मी  न  राहिलो
गुगीत तुझ्या  मी  धुंद   झालो
तू  रहावस  माझ्या  समोर
तूझ्या  प्रेमात  सार्या  जगाला  विसरव
असाच काहीस  वाटतंय  आज  मला
तूझ्यासाठी