कळी

Started by sunitav, February 07, 2014, 08:49:34 AM

Previous topic - Next topic

sunitav

एक कळी येउन
हळूच कानात बोलली

पुरते उमलायच्या आतच
झाडापासून मी वेगळी केली गेली

पायदळी तुडवताना त्याला कस काहीच नाही वाटल
निर्दयीपणे त्याने मला कुस्कुरुन टाकल

त्याच्या स्पर्शाच्या आठवणीने आजही येते शिसारी
माणसाची जात सापापेक्षाही विषारी

एवढ बोलून ती गेली निघून
पण जाताना मात्र अश्रू ओघळले दोन गालावरून

                       सुनिता.