फक्त एकदाच हो म्हण..........

Started by Swapnil.jagtap, February 08, 2014, 09:24:58 AM

Previous topic - Next topic

Swapnil.jagtap

फक्त एकदाच हो म्हण

तुझ्या प्रेमात वेडा झालो मी
कस सांगू तुला अन कुणालाही
तुझ्या प्रेमाच्या धुंदीत धुंदलो
तुझ्या केसांच्या छायेत गुंतलो ||

तुझ्या डोळ्यांनी ही केली नशा
मी झालो ग वेडापिसा
तुझ्या प्रेमाने ग आली लहर
सर्वदीशा मी केला कहर ||

अप्सरेसारखे डोळे तुझे
अप्सरेसारखे ओठ आहे
सांगू कसं कुणा मी
ही पण अप्सराच आहे ||

तुझ्या प्रेमात पडूणी
मला कळले जीवनाचे सार
मला दे ग तुझे तू
दिवसातले मिनिट चार ||

तुझ्यासाठीच गं हे जीवन
तुझ्यासाठीच गं माझ हसण
तुझ्यासाठीच गं ते माझ
वेड्यासारख खिडकीत बसण ||

तुझ्याशिवाय जगन व्यर्थ
तुझ्यासंमवेत मन हे हसत
फक्त एकदाच हो म्हण ||

                                               कवी
                                   स्वप्नील दिलीप जगताप