प्रिये

Started by कवी-गणेश साळुंखे, February 08, 2014, 10:19:58 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* प्रिये *
अबोल भावना माझी प्रिये
सांग तुला कळणार कधी
एकटा राहिलोय मी आजपर्यंत
प्रेमाने जवळ घेणार कधी

नजरेला नजर मिळते प्रिये
ओठांना ओठ मिळणार कधी
स्वप्नात येउन भेटतेस रोज
स्वप्नाला माझ्या साकारणार कधी

चंद्र लाजे पाहुन तुज प्रिये
चांदनीला तो भेटणार कधी
सोळा शृंगाराने सजुन प्रिये
घरी माझ्या येणार कधी

प्रेमासाठी व्याकुळ तुझ्या प्रिये
प्रेमात आपल्या भिजवणार कधी
प्रेमाने जीवनभर जगण्यास प्रिये
साथ तुझी लाभणार कधी.
कवी-गणेश साळुंखे.
Marwad. Tal-Amalner, Dist-Jalgaon
Mobile -8108368222