प्रीत

Started by SANJAY M NIKUMBH, February 08, 2014, 06:42:56 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

प्रीत

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
मी भुलत गेलो
तू सोडत होतीस केस मोकळे
मी मात्र गुंतत गेलो

तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत गेलो
त्या मोहवणाऱ्या क्षणात
मी हरवत गेलो

तुझ्या पुसटश्या स्पर्शानही
मी बेभान होत गेलो
तो गंध माझ्या तन -मनात
नकळत साठवत गेलो

कळलं नाही हा श्वास
कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर
मी कसा करत गेलो .
====================
संजय एम निकुंभ , वसई