प्रेमाची नजर…

Started by SANJAY M NIKUMBH, February 08, 2014, 07:19:03 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

प्रेमाची नजर..............................संजय निकुंभ
----------------------------
नजरेची भाषा कळली की
मन कळायला लागतं
अबोल राहिले ओठ तरी
हृदय समजायला लागतं

जाणीवा साऱ्या मनीच्या
डोळ्यात दिसायला लागतात
भावना त्या प्रीतीच्या
काळजाला कळायला लागतात

हृदयात प्रेम उमललय
हृदयाला बरोब्बर कळतं
माझं तुझ्यावर प्रेम आहे
न सांगताही कळतं

प्रेमाची सुरवात नेहमी
अबोल कशी असते
कळत नाही प्रियेच्या
प्रीत नजरेत कशी दिसते

फक्त ती नजर
वाचता यायला हवी
जी प्रीत आपली आहे
ती ओळखता यायला हवी .
----------------------------------
संजय एम निकुंभ , वसई