धुंद

Started by anolakhi, August 23, 2009, 02:18:53 PM

Previous topic - Next topic

anolakhi

आज या मंद पहाटे,
नभ का धरणीवर कोसळतो?
मनाच्या अंधारलेल्या कोनाड्यात,
कोणत्या आठावणिचा धुंद प्रकाश मिसळवितो ?

जपले होते जे,
मनात विरघळलेले गुज लपविलेले,
डोळ्यात थाम्बविले बंद पापण्यात बांधिलेले,
दिस उगताच का ते हितगुज स्वतहालाच आज सांगितलेले?

अशी का ती हाक होती?
स्वतहालाच,किव्हा कोण्या दुसरयाला होती?
गगनी कोसळून,परत माझ्यातच विरलेली,
या अनंतातही का जागा टोकडिच पडली?

होते नभ ही पाणावलेले,
होते मनही दुरावालेले,
होते आपलेच कोणी उगी रागावलेले...
उसने मन माझेच मज पाशी,
कोणत्याच कर्जात जणू पार व्याजावलेले...


स्पर्शात कोण्या आठवणीच्या,
आजही ओलावा जाणवितो,
मनात आहेत...आहेत ना ज्या भावना,
त्याना आपलाच मानवितो....

आज या मंद पहाटे,
नभ का धरणीवर कोसळतो?
मनाच्या अंधारलेल्या कोनाड्यात,
कोणत्या आठावणिचा धुंद प्रकाश मिसळवितो ?

rajeshk125

मैफलीत तुझ्या बसूनही, मनी माझ्या एकांत का ?

हास्यामागे दडलाय, अदृश्य हा आकांत का ?

उजाडलाय दिवस तरीही, जीवनी माझ्या अंधार का ?

सोबत आहेस तू तरीही, असह्य हा दुरावा का ?

______________________________________राजेश काळे