पाऊस

Started by ap01827, February 10, 2014, 05:45:01 PM

Previous topic - Next topic

ap01827

सखीने एकदा मला
कुचेष्टेने विचारले
'' मी कशी दिसते ? ''
'' पावसासारखी ''
मी उत्तरलो
'' मी कशी हसते ? ''
'' पावसासारखी ''
'' माझ्या डोळ्यात काय ? ''
'' पाऊस ''
'' आणि माझ्या मनात ? ''
'' पाऊस ''
ती उत्तरली
'' अरे वेडया
हा पाऊस नाही
सहस्र थेंबानी
श्रावणात
धो धो कोसळणारा !
माझ्या मनात
फक्त्त आहे तु
रोमांरोमांतून
रक्त्तासारखा सर्वत्र
सळसळणारा !! ''

              संदीप लक्ष्मण नाईक
('' पाऊस " या आगामी काव्य - संग्रहातुन )