गुलमोहर

Started by ap01827, February 11, 2014, 06:46:16 PM

Previous topic - Next topic

ap01827

तु जेव्हा हसते
तेव्हा बहर येतो
सदा त्या गुलमोहराला...
पण,
ज्या ज्या वेळी पहातो
तुला मी हसताना
निरपराध कुणाचा तरी
जीव जातो
आणि
खचाखच बहरलेल्या
गुलमोहराच्या पायथ्याशी
लाल फुलांचा सडा पडतो......

             संदीप लक्ष्मण नाईक