अश्रुं

Started by कवी-गणेश साळुंखे, February 11, 2014, 09:52:12 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

हे मना उगाच रडु नकोस
व्यर्थ अश्रुं पुन्हा ढाळु नकोस
सावर आता तु स्वताला
जीवन असे दुखात घालवु नकोस

झाले गेले विसर सर्व आता
दिशाहीन असा भटकु नकोस
ती तर केव्हाच विसरली तुला
आठवण उरात तिची बाळगु नकोस

चुक जेव्हा कळेल तिची तिला
तेव्हा पश्चातापाची संधी तिला देउ नकोस
दाखवुन दे या जगाला प्रेम असते काय
भावनांचा बाजार ईथे मांडु नकोस

जग जीवन असे तु आता
नैराश्याच्या चक्रव्युहात अडकु नकोस
मिटवुन टाक सर्व आठवणींना
पुन्हा थारा त्यांना ह्रदयात देउ नकोस

एकदा दिली होती संधी तु त्यांना
पुन्हा वादळ ते अश्रुंचे पिउ नकोस.
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222