पश्चाताप

Started by कवी-गणेश साळुंखे, February 11, 2014, 11:57:02 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

चुकुन तिच्या हाती माझं पुस्तक पडले
त्यात तिला तिचंच रुप दिसले
वाटलं होते तिला विसरला असेल मला
पण प्रत्येक कवितेतुन पाहत होती स्वताला

वर्षामागुन वर्ष सरली होती आठवणीत
तरीही तिला जपले कवितांच्या रुपात
आज चांगलेच कळले होते तिला
आपण खुपच दुखवले होते त्याला

सोडुन त्याला आपला संसार मांडला
मनातुन तर तो कधीच निघुन गेला
काळाच्या ओघात विसरुन गेले त्याला
अन त्याच्या निरागसनिष्पाप चेह-याला

पण त्याने ना घृणा केली ना दोष दिला
सुखासाठी तिच्या दुख झेलत राहिला
मग पश्चातापाच्या अश्रुंनी ती
भिजवु लागली माझ्या पुस्तकाला.
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222