तू हवी

Started by अरुण राऊत ( अविरा ), February 12, 2014, 01:42:36 AM

Previous topic - Next topic

तुझ्या एकटक नजरेत भुललं मन माझं
तुझ्या लोभस हसण्यात गुंतलं मन माझं
तुझ्या गोड बोलण्यात अडकलं मन माझं
तुझ्या मोकळ्या केसात फ़सलं मन माझं

देह अन भान विसरलं मी
भूक अन तहान सोडलं मी
नीज अन चैन हरलं मी
हरघडी एकच जाप करतं मन माझं
तू हवी....तू हवी....तू हवी

ओढीत हर एक श्वास मोजतो मी
चाहुलीत सगळे विश्व फिरतो मी
नकळत विचारांचे जाळे विणतो मी
हर घडी एकच जाप करतं मन माझं
तू हवी....तू हवी....तू हवी

प्रीत असतं काय जाणलं मी
नयनी जागेपणी स्वप्नं पहिलं मी
जीवन आरसा तुलाच मानलं मी
हर घडी एकच जाप करतं मन माझं
तू हवी....तू हवी....तू हवी....

- अरुण राऊत (अविरा)