असेच असू दे प्रेम आमचे ..........

Started by प्रशांत दादाराव शिंदे, February 12, 2014, 11:21:52 AM

Previous topic - Next topic
जेव्हा  मनाला हुरहूर लागते
तिचा भास होतो
अन श्वासांचे संगीत तिच्या माझ्या कानी पडू लागतं..................

असेच असू दे प्रेम आमचे ........

ती आहेच अशी की मोहात कुणीही पडावे
कधी इतक्या जवळ असते माझ्या की
दोघांत काहीच अंतर नसतं
अन कधी इतक्या दूर असते की
डोळ्यांना  दूरवर तिचे चित्रही नसतं ..............

तिला माझे प्रेम कसे कळलं
हे एक गुपितच आहे
जेव्हा ओठांजवळ  ओठ येतात
श्वासही फुलू लागतो
मग .....
मिठीत येताच  दोघांसही   कळतं....खरंच आता एकमेकांची गरजच आहे ....

ती म्हणते मला खूप खूप आवडतोस तू 
मी म्हणतो तू माझा श्वास आहेस 
तुझ्याशिवाय माझे आयुष्य जसे अंधारलेले विश्वच आहे .....

खूप प्रेम आहे दोघांचे हे दोघेही जाणतात
म्हणूनच तर  थोडे भांडण तर कधी
आसवे आणुनी  सतत जवळ येण्याची कारणेच  शोधतात ..............

असेच असू दे प्रेम आमचे ...............

किंमत दोघांच्या मनाची होती
न होते गर्व  सौंदर्याचे कधी
म्हणूनच तर हे नाते  खूप पवित्र वाटत होते ........

शपथ  घेत होते रोजच 
स्वप्नही दोघांनी पाहिली
थोडे थोडे करून झोपड्याला ही ते  महलाचे रूप देत होते ...............

असेच असू दे प्रेम आमचे ........

असेच जगत होते दोघेही  मिठीत एकमेकांच्या मग
मृत्यूही सोबतच  येउ दे
दोघांनी  निरोप घेतला जरी सोबत
मग दुनियानेही आपल्या प्रेमास पाहून रडू दे ..................

असेच घडू दे  प्रेम करणा~यांचे
इतिहासाने   ही मग  प्रेमाला शब्दरूपी उतरवू दे .............
असेच असू दे प्रेम आमचे
आज सा~यां जगाला   पाहू दे .............
-
©प्रशांत डी शिंदे
दि.१२/०२/२०१४