कविता

Started by sunitav, February 12, 2014, 02:15:47 PM

Previous topic - Next topic

sunitav

जेव्हा  जेव्हा  वाचून दाखवते मी त्याला कविता
तो म्हणतो पुरे कर आता

काय पडल ह्या शब्द जोडण्यात
ट ला ट आणि म ला म लावण्यात

अग विज्ञान बघ किती पुढे गेलय
अन तुझ सार लक्ष्य कवितेतच लागलय

त्याला कस कळत नाही
श्वासात माझ्या कविता
पण विज्ञानात रुची नाही

विज्ञानाचा मला गंध नाही
कवितेचा त्याला छंद नाही

विज्ञान जरी मला कळत नसल
तरी संसारच गणित जमत

शब्द हि न बोलता
त्याला माझ्या मनातल सार कळत

...सुनिता.