असाच आहे मी …………

Started by SANJAY M NIKUMBH, February 12, 2014, 09:27:45 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

असाच आहे मी .....................संजय निकुंभ 
===========
किती धुंद क्षण जगलो
कधी एकांतातही रमलो
तरी हातात हात घेण्या पलीकडे
माझी मजल नाही गेली

किती उफाळल्या भावना
कधी बेभानही झालो
तुझे गाल दिसले आरक्त
तरी दूरच मी राहिलो

तुझ्या डोळ्यातले भावं सांगत होते
किती वेडा आहे मी
तू घे नां किस माझा
मी तुला सांगत राहिलो

प्रश्नांच वादळ ... दिसलं तुझ्या मनात
असा कसा आहे मी
जो पुढाकार मी घ्यावयास हवा
तो तुला कसा सांगतो मी

पण याचं गुपित आज
मी तुझ्यापुढे उलगडणार आहे
जे स्वप्न पाहिलं नव्हतं कधी
ते प्रेम ...... तुझ्या रूपांत भेटलं आहे

म्हणून हे प्रेम .... हातून निसटेल की काय
याचं दडपण माझ्या मनावर ....
अन मी ठरवलंच आहे
तुला पहिला किस केलाच तर करीन पावलांवर
कारण प्रीतीचे पाउल घेवून तू आलीस जीवनात
अन स्वप्नवत करून टाकलस माझं अवघं आयुष्य .
--------------------------------------------------------
दि. ११. २ . १४  वेळ : २.४५  दु.