तिला विसरायचं हेच विसरून जातो .........

Started by Er shailesh shael, February 13, 2014, 09:46:04 AM

Previous topic - Next topic

Er shailesh shael

तिच नाव लिहून लिहून पुसायला विसरून जातो
तिची जेव्हा आठवण काढतो विसरायला विसरून जातो...

फार काही सांगायचं असत तिला जे हृदयात आहे
पण जेव्हा पण भेटतो ऐकवायला विसरून जातो...
   
भेटल्यावर अजून थोडा वेळ तिनं थांबावं असं वाटतं
पण ती भेटली कि तिला थांबवायचं विसरून जातो.....


आता तिच्या शिवाय दिवस सरता सरत नाही
पण नेहमी स्वप्नात तिला हे सांगायच विसरून जातो...

माझी प्रत्येक संध्याकाळ सांगते विसर तिला आता
पण सकाळ झाली कि तिला विसरायचं हेच विसरून जातो ....
तिला विसरायचं हेच विसरून जातो .........
                                   ---Shailesh shael

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]