कधी कळले नाही मन माझे तुझे झाले........

Started by kavita.sudar15, February 13, 2014, 10:44:40 AM

Previous topic - Next topic

kavita.sudar15

कधी कळले नाही मन माझे तुझे झाले,
तुझ्यासवे संसार करण्याचे स्वप्न आज साकारले......
सुख पावसासम यावे, आयुष्य अन हे भिजावे.,
  तुझ्याच मनात नेहमी घर एक माझे वसावे........
तुझी भार्या म्हणून आले सगे सोयरे टाकून पाठी,
  तुझ्यातच सारे जग पाहते मी, जीव अडकतो तुझ्याचसाठी.....
चूक माझी नेहमी असते, पण शिक्षा मात्र स्वतास करतोस,
  कधी दूर असेन मी तुझ्यापासून तर लहान मुलासारखा रडतोस......
साथ तुझी मला आयुष्यभरासाठी हवी आहे,
  तुझीच राणी बनून मला या जगात राहायचे आहे......
या जन्मी नाही रे पुढील सात जन्म तुझ्यासाठी जन्मेन मी,
    तुझीच सावली बनून तुझ्या आजूबाजूला दिसेन मी........
फुलांच्या गंधात तुझाच सुवास घेते मी,
  सूर्याच्या किरणांत तुलाच शोधते मी......
खूप प्रेम करते मी तुझ्यावर,
   तुलाच प्रत्येक श्वासात मागते मी......
प्रेमदिनाच्या या दिनी तुला दुसरे काही मागत नाही,
   काही चुकले असेल माझेही पण प्रेम माझे तुझ्यावरील खोटे नाही.....
द्यायचेच झाले तर तुझ्या प्रत्येक क्षणातील एक क्षण दे,
   प्रेमाच्या या वाटेवर मला एकटे सोडू नकोस एवढेच मागते मी......
जगात सारे काही आहे खूप सुंदर,
  पण तुला कसे सांगू कि तूच आहेस माझे विश्व आणि अंबर......
काटेरी आहेत वाटा खडतर आहेत रस्ते
  जखमा होऊ देऊ नकोस रे खूप टोचतात हे विरहाचे काटे....... @ कविता @

 

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]