दे

Started by कवी-गणेश साळुंखे, February 13, 2014, 11:27:41 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


हा वारा असाच वाहु दे
चाहुल पावसाची लागु दे
केसांना चेह-यावर उडु दे
दोघांना प्रेमाने भिजु दे

भिजलेल्या अंगाने खेटु दे
मोरपिस हळुवार फिरु दे
ओल्या केसांना सावरु दे
ओठांना ओठ मिळु दे

तुझ्या मिठीतच राहु दे
सा-या जगाला विसरु दे
सुंदरता तुझी न्याहाळु दे
बंधने आज तुटु दे

स्वप्नाला माझ्या साकारु दे
असे एकजीव होउ दे
डोळ्यांत तुझ्या लपु दे
काळजातच नेहमी राहु दे.
कवी-गणेश साळुंखे...!

Mobile -8108368222