आयुष्य...

Started by शिवाजी सांगळे, February 14, 2014, 10:18:40 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नाते फुलांचे सारयांशी             
आपसूक का होत जाते?   
वाटून गंध सगळ्यांना
सूर मात्र काटयांशी होते !

ङोळयांची अन सागराची
खोली का एक असते ?
म्हणुनच का दोन्ही कडे                     
कायम तसेच पाणी वसते ?

उधळून आयुष्य मी
सारेकाही गमविले होते,
घेउनी फाटकी झोळी                         
हात माझे रिते होते !

नाही दु:ख मजला त्याचे
सारेकाही मला हवे होते,       
तेंव्हाही मी हसत होतो
जीवनात जेंव्हा दु:ख होते !
 


© शिवाजी सांगळे


©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९