उच्च अभिरुचीचा झगा

Started by विक्रांत, February 15, 2014, 08:37:16 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

तथकथित उच्च अभिरुचीचा
झगझगीत झगा घालून
मी निघतो जेव्हा रस्त्यानं
जागोजागी ठिगळ लावलेले
जुने दमट कोट अवघडले 
दिसतात मला बसलेले कोंबून
त्या त्यांच्या वडिलोपार्जित
शिसवी खुर्च्यातून
अवघी हवा जड होते
जाते ओशाळून
नकळत मग मी ही
तो माझा झगा उतरवून
त्या खुर्च्यामध्ये बसतो जावून
कारण..
शेवटी महत्वाच असत
जगणं !!
कुणाच्यातरी सोबत
घेत काहीतरी वाटून

विक्रांत प्रभाकर