♥ माझे पहिले प्रेम ♥

Started by sumitchavan27, September 03, 2009, 09:07:26 PM

Previous topic - Next topic

sumitchavan27

माझे पहिले प्रेम म्हनजे
जनु पोरकटपनाच होता
पन त्या दिवसामधला
त्याचा रंगच भारी होता

प्रेमाच्या त्या वाटेवर
आमची पावले पडत होती
पन त्या वाटेवर तेव्हा
गर्दी थोडी जास्तच होती

पहिल्या वेळेस पाहिले
तेव्हाच ती मनात भरुन गेली
हिच्यापेक्शा दुसरी सुंदर नसेल
अशी शंका येउन गेली

काही दिवसातच दोघांची
नजरानजर झाली
तिच्या एका नजरेने
आमची छाती धडकुन गेली

काही दिवसांनी ही गोष्ट
सगळी कडे पसरत गेली
मित्र म्हने याला अचानक
प्रेमाची हुकी कशी आली ?

रात्र रात्र तिच्या आठवनीत
आम्ही प्रेमपत्रे लिहित होतो
होकार मिळेल की नकार
एवढाच फ़क्त विचार करीत होतो

करुन धाडस जेव्हा तीला
आम्ही प्रेमपत्र दिले
मित्रानी तेव्हा सांगितले
आता तुझे नही खरे

तेव्हा कळले की हीचे आधीच
बाहेर दहा प्रकरन आहेत
मुलांना फ़िरवन्याचे हिचे
तंत्र जुने आहे

आम्हाला आवडलेली रानी
नेहमी दुसरय़ाचीच असते
आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते

Ravi Kapoor

कशी असेल ती अता ?
असेल का ती ठीक ??
अता तिला जून सर्व आठवत असेल का??
आठवल्या क्षणामध्ये परत ती जाऊ पाहेल का??
गेलीच तरी तर ,त्या क्षणात मला पाहिलं का??
पाहिलं जरी मला तर , एकदा तरी मला परत बोलवेल का??
बोलावले तरी माझ्यासंगे प्रेमाचे २ शब्द म्हणेल का??
माझ्यासाठी तीच मन परत,माझ्या मनाशी हितगुज साधेल का??
साधल तरी मनातले प्रश्न,सुख दुख माझ्यासमोर मांडेल का??
मांडले तरी ,मी दिलेल्या त्या उत्तरांचा ती विचार करेल का???
माझ्यासाठी परत ,सर्वांसाठी ती झगडेल का???
दिलेल्या आठवणीत परत मागण्याचा देवा कडे हट्ट करेल का??
प्रत्येक क्षणी नाही पण दिवसातून एकदा तरी आठवण काढेल का???
काढलेल्या त्या वेळात फक्त मलाच ती पाहेल का??
मी नाही होऊ शकलो तिचा ,तरी ती आनंदात राहील ना???
माझ्यापेक्षा हि जास्त प्रेम देणारा तिला मिळेल ना???
त्याच्या सहवासात राहून सर्व दिलेले क्षण विसरून ती आनंदी राहेल ना
मी दिलेले सर्व क्षण ,आठवणींची जळमट मनाच्या गाभार्यातून काढून टाकेल ना???
आयुष्याच्या तिच्या सुंदर वळणावर एकदा तरी माझी आठवण तिला येईल ना??
आली तरी माझ्यासाठी ,तिचे डोळे पाणावतील ना ??

माझ्या मनात असा मग प्रश्नाचा साठा साचला
एका तरी उत्तरासाठी तो वाट पहाट बसला :


Ravi Kapoor

क्षण एक आसुसलेला, शांत, गहिवरला,
क्षण एक उगाच थांबलेला, अडखळलेला,
क्षण एक पुरेसा स्वप्न पंखलाउनी उडायला,
क्षण एक पुरेसा धरेस कोसळायला,

क्षणाक्षणात क्षण निघाले,
जीव लावायला, जीव गुतायला,
रंग रांगोटयांनी आकाश रंगवायला,
क्षण एक बलत्तर, वादळ उडवायला,
सजवले घरटे मोडायला.

क्षण एक कोलमडलेला, तुटलेल.
क्षण एक उरी दाटलेला, लोचनी साठलेला,
क्षण एक ओठान पलीकडे दडलेला,
स्थिर,स्तब्ध, पण आत काहूर माजलेला.

क्षण विचारी, क्षणच सोडवी,
क्षण क्षणात रडवी, क्षणच क्षणात हसावी,
क्षण घायाळ करी, क्षणच औषधी,
क्षण एक प्रश्न, आणी तेच त्याचे उत्तर.



क्षण प्रेमाचे साठुनी, झाले आठवणी,
क्षण विरहाचे, गेले रात्र जागवुनी,

क्षण माझे, क्षण तुझे,

क्षण भेटीचे, लाजरे, लपलेली, बिथरलेले,
एकत्री घालावलेले, रमलेले, ज्वलंत पेटलेले.

चित्र कधी रंगवलेले, क्षणात अश्रू तून वाहले.
तरीही, शेवटी क्षणच राहले, हसरे, गोजिरे.
क्षण पुन्हा पुलवी जीवन, क्षणात पुन्हा बहरेल आंगण.
क्षण एक बल्तर,
बाकी सगळे निरुत्तर, बाकी सगळे निरुत्तर.






avinash.dhabale

जाणिले मी आज काय तुझ्या मनात होते,            
काय सत्य दडले त्या क्षणांत होते,            
उगवला सूर्य रोज याचीच वाट पाही ,            
कंटाळून मग तोही अस्ताला जाई,            
            
जाशील दूर तू मी काही बोललो नाही,            
तुझ्याही मनातल्या भावना तेव्हा मनातच राही,            
व्हावे व्यक्त कुणी हे कोडे दोघानाही होते,            
जाणिले मी आज काय तुझ्या मनात होते...            
            
मन गुंतले होते एकमेकांत खात्री कुणालाच नव्हती,            
संवाद होता दोघांत पण त्याची दिशाच वेगळी होती,            
मनातल्या गोष्टींवर मन बरेच ताबा ठेवत होते,            
जाणिले मी आज काय तुझ्या मनात होते...            
            
अजूनही वाटते या नात्याची वेगळी सुरुवात व्हावी ,            
गुलाबी नवी पहाट आपल्या जीवनात यावी ,            
तोडून टाकू आपल्या मनाभोवती जे कुंपण होते,            
जाणिले मी आज काय  तुझ्या  मनांत  होते....            
            
उत्तरे मिळालीत अनेक तरी एक प्रश्न अजूनही आहे ,            
सूर्य उगवतो तो मावलण्यासाठीच  काय जगत आहे,            
न बोललो मी तूच हे सांगायचे होते,            
नाही कळले का तुला काय माझ्या मनात होते,            
काय  सत्य  दडले  त्या  क्षणात  होते........            
            
         ..................   अविनाश